बातम्या
डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकचे विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये उज्वल यश
By nisha patil - 2/3/2024 12:49:53 PM
Share This News:
कोल्हापूर: येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) च्या खेळाडूंनी विभागीय स्तरावर कुस्ती , वेट लिफ्टिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. खो खो क्रीडास्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने राज्यस्तरीय उपविजेतेपद मिळवले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
"स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नियमितपणे खेळले पाहिजे" असे प्रतिपादन प्राचार्य साळुंखे यांनी याप्रसंगी केले. इंटर इंजीनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या अत्यंत चुरशीच्या क्रीडास्पर्धांमध्ये खेळाडूंनी हे यश मिळवले. राज्यातील विविध तंत्रशिक्षण संस्थांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. क्रीडाप्रकार आणि यशस्वी खेळाडू/संघ पुढीलप्रमाणे:
मुलींचा राज्यस्तरीय उपविजेता खो-खो संघ: श्रुतिका रेडेकर (कर्णधार), संस्कृती पाटील, समृद्धी लोहार, समृद्धी गुरव, प्राजक्ता बनगे, वैष्णवी भांदिगरे, सृष्टी कारंडे, देविका यादव, साक्षी नाईक, संचिता सुर्वे, गौरी बोलावे, तानिया काटीगर.
मुले:
कुस्ती : आयुष उदगट्टी- विजेता (१२५ किलोग्रॅम गट), अंगद चौगुले - विजेता (६५ किलोग्रॅम गट)
वेट लिफ्टिंग: ओंकार कदम - विजेता (६३ किलोग्रॅम गट)संतोष डोंगरे - विजेता (५६ किलोग्रॅम गट), ओंकार मेथे - उपविजेता ( ८५ किलोग्रॅम गट)
टेबल टेनिस संघ : विराज मुसळे (कर्णधार) , ऋषिकेश अडूरकर, सुमेध बोलकर , आयुष भांदिगरे , निलय पोतुडे.
बास्केट बॉल संघ: अझीम चित्तेवान (कर्णधार) , रविराज मोरे , राजवर्धन सरनोबत, देवराज टिपुगडे, मेहुल कुचनुरा, ऋषी दुल्हानी, श्रमण पाटील , आदित्य शिरसाट.
सर्व खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे, डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री.विरेन भिर्डी यांचे मार्गदर्शन लाभले. पॉलिटेक्निकचे क्रीडाप्रमुख श्री.अमित आव्हाड आणि प्रा. सरिता चव्हाण यांनी परिश्रम घेतले. प्रा. बळीराम पाटील, प्रा. प्रणव बेरलेकर, प्रा. मृणाल पवार, श्री. सुभाष कुंभार, श्री. पंडित तासगावकर, श्री. अक्षय चिंदे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकचे विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये उज्वल यश
|