बातम्या

डॉ. सुनील जयसिंग रायकर यांची हंगेरीमध्ये तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड

Dr By Sunil Jaising Raikar Re elected as expert reviewer in Hungary


By nisha patil - 5/8/2023 6:08:18 PM
Share This News:



कोल्हापूर कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची हंगेरीच्या नॅशनल रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन (NRDI- Office ) ऑफिसवर तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड निवड  झाली आहे. 
 

नॅशनल रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन (NRDI ) कार्यालय संपूर्ण हंगेरीच्या संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विविध संशोधनन कामे व नवे  प्रकल्प यासाठी निधीचे वाटप करते. डॉ. सुनील जयसिंग रायकर यांचे नामांकित जर्नल्समधील शोध निबंध, लेख, नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्ससाठी केलेले रिव्यूज़, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, शिक्षण व संशोधन क्षेत्रातील त्यांचे  कार्य याची दखल घेऊन हि निवड करण्यात आली आहे. 
 

नवनियुक्त कार्यालय समीक्षक या नात्याने, डॉ. रायकर एनआरडीआयच्या संशोधन उपक्रमांची गुणवत्ता, अखंडता आणि प्रभाव सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. संशोधन प्रस्तावांचे बारकाईने पुनरावलोकन करणे, प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचे आणि  पद्धतींचे मूल्यांकन करणे आणि संशोधक आणि प्रकल्प संघांना रचनात्मक अभिप्राय प्रदान करणे यासाठी ते जबाबदार असतील. अत्याधुनिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी एनआरडीआयची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ते काम करतील. 
  एनआरडीआय ऑफिस बोर्डवर तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेर निवड होणे हा सन्मान आहे.  हंगेरीमधील संशोधन आणि विकासाचे भविष्य घडविण्यासाठी योगदान देण्यासाठी आणि सहकारी संशोधकांसोबत काम करण्याबाबत आपण उत्साही असल्याचे डॉ. रायकर यांनी या निवडीनंतर सांगितले.  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील व पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता , प्राचार्य एस. डी. चेडे यांचे त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले .


डॉ. सुनील जयसिंग रायकर यांची हंगेरीमध्ये तज्ज्ञ समीक्षक म्हणून फेरनिवड