बातम्या

डॉ. चेतन नरके यांनी माघार घेतल्याने कार्यकर्त्यात नाराजी

Dr Chetan Narke withdraws anger among activists


By nisha patil - 10/9/2024 4:12:44 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून गेली दोन वर्ष पायाला भिंगरी बांधून जिल्हा दौरा करणाऱ्या गोकुळचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. नरके हे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. त्याने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या भेटी घाटी ११५० गावात जाऊन घेतल्या होत्या. मात्र उमेदवारीची लॉटरी काही त्यांना लागली नाही.थायलंडसह अशिया खंडातील अनेक देशांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून   कोल्हापूरातील राजकीय, सामाजिक, कला,क्रिडा क्षेत्रात यापुढे तितक्याच जोमाने कार्यरत राहणार आहे.दरम्यान बुधवारी, १७ एप्रिल रोजी नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
 

नरके म्हणाले, 'काही अपरिहार्य ,राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी सांगितले. युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. तसेच थायलंडसह अशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी प्रयत्न तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे  डॉ. नरके यांनी  तारा न्युज शी बोलताना सांगितले.


डॉ. चेतन नरके यांनी माघार घेतल्याने कार्यकर्त्यात नाराजी