बातम्या
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीला मान्यता
By nisha patil - 7/14/2023 8:43:42 PM
Share This News:
कोल्हापूर/ डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी या नव्या महविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रियासुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
गगनबावडा तालुक्यातील वेसरफ - पळसंबे येथे हे नवे महाविद्यालय सुरू होत असून या ठिकाणी तीन वर्षाचा 'बीएस्सी इन शुगर टेक्नॉलॉजी' हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी बारावी सायन्स उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
वैदयकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपची ओळख आहे. गेल्या ४० वर्षात शिक्षण क्षेत्रात लाखो गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या या ग्रुपने आता साखर व पूरक उद्योगात करिअर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नवे शैक्षणिक द्वार उघडले आहे.
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी सह खासगी क्षेत्रातही साखर आणि पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत. या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी’ हे नवीन महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.
गगनबावडा येथील डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना परिसरातच हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्षिक कामाचा अनुभवही विद्यार्थ्याना मिळणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चांगल्या करिअर संधी उपलब्ध होतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यानी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीला मान्यता
|