बातम्या

डॉ.डी.वाय.पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

Dr D Y Polytechnic team wins badminton tournament


By nisha patil - 1/2/2024 9:54:43 PM
Share This News:



डॉ.डी.वाय.पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद 
 

इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत १६  अभियांत्रिकी पदविका संघ सहभागी झाले होते. अंतिम फेरीत डी. वाय.पॉलिटेक्निक संघाने गव्हर्मेंट पॉलिटेक्निक रत्नागिरी या संघावर २-० असा सलग सेट मध्ये विजय मिळवला.
 

विजयी संघात  प्रथमेश मोरे, अथर्व शिंदे, यश पाटील, हेत छाबिया यांचा समावेश आहे.
 डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी पाटील , ट्रस्टी आ.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉ.महादेव नरके, जिमखाना विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, रजिस्ट्रार सचिन जडगे ,सूरज जाधव उपस्थित होते.

फोटो ओळी: विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक संघातील खेळाडूंचा सत्कार करताना  डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी पाटील , ट्रस्टी आ.ऋतुराज पाटील


डॉ.डी.वाय.पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद