बातम्या
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये 'इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल'ची स्थापना
By nisha patil - 12/8/2024 12:31:42 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये 'इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल'ची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप्स कल्पना, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (IPR) , इंडस्ट्री ओरिएंटेड रिसर्च, नवकल्पनांना उत्तेजन, स्वयंरोजगार आवश्यक कौशल्यांचा विकास करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून प्राप्त निर्देशानुसार इन्स्टिट्यूटने कौन्सिलच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.
याप्रसंगी, प्रा. दीपक महाजन यांचे 'अभियांत्रिकी आणि नवउद्योजकता ' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना औद्योगिक उत्पादनांमध्ये बदलण्यासाठी आवश्यक असणारी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी, पेटंट नामांकन, समस्या समाधान, संशोधन, क्रिटिकल थिंकिंग, जनसंवाद अशा अनेक विषयांवर मते मांडली. " कौन्सिलला रचनात्मक स्वरूप देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्योगस्नेही संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी कौन्सिलद्वारे सहकार्य केले जाईल" असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी केले. " विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांना इंटर्नशिपची संधी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव यावा यासाठी कौन्सिलमार्फत इन्स्टिट्यूट- इंडस्ट्री सामंजस्य करार केले जात आहेत. त्यामुळे सक्षम अभियंता निर्माण होईल" असा विश्वास इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी व्यक्त केला.
कौन्सिलतर्फे आधुनिक ज्ञान आणि कौशल्याने परिपूर्ण मनुष्यबळाचे निर्मितीसाठी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे कौन्सिलच्या समन्वयिका प्रा. एस. एम.भोरी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी या उपक्रम आणि सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये 'इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल'ची स्थापना
|