बातम्या
डॉ. धनंजय सुतार यांना एक्सलंट लायब्ररियन पुरस्कार
By nisha patil - 11/3/2024 12:25:24 PM
Share This News:
डॉ. धनंजय सुतार यांना एक्सलंट लायब्ररियन पुरस्कार
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे प्रभारी संचालक व उपग्रंथपाल डॉ. धनंजय सुतार यांना महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विभागातील ग्रंथालय व्यवसायामध्ये केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 'मुकला एक्सलंट लायब्ररीन अवॉर्ड ' देऊन गौरविण्यात आले.
दि. 6-7 मार्च 2024 रोजी मुंबई विद्यापीठ येथे आयोजित महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररीयन्सअसोसिएशन (MUCLA) यांच्यामार्फत आयोजित सातव्या राष्ट्रीय परिषदेमध्ये हा पुरस्कार डॉ. सुतार यांना डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई चे कुलगुरू प्रा . डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
ही राष्ट्रीय परिषद ही मुंबई विद्यापीठ, मुंबई ;एस.एन.डी.टी. वूमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई तसेच इंडियन लायब्ररी असोसिएशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली. याप्रसंगी 'मुकला'चे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, सचिव डॉ. विनय पाटील, समन्वयक डॉ. नंदकिशोर मोटेवार,मुंबई विद्यापीठ तसेच डॉ. सुभाष चव्हाण ,एस एन डी टी विद्यापीठ आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे निवृत्त माहिती शास्त्रज्ञ डॉ. एन बी दहिभाते उपस्थित होते.
डॉ. धनंजय सुतार यांना एक्सलंट लायब्ररियन पुरस्कार
|