बातम्या

डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

Dr Organized National Level Technical Competition at Bapuji Salunkhe Institute


By nisha patil - 2/21/2024 5:43:12 PM
Share This News:



कोल्हापूर :डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन(आय एस टी ई),नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने 'इंपल्स २०२४' या राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, पोस्टर प्रेझेंटेशन आणि क्विझ कॉम्पीटिशन स्पर्धेचे आयोजन दि .२४ फेब्रुवारी रोजी डॉ . बापूजी साळुंखे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आले आहे. पदविका आणि पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

'इंपल्स २०२४' स्पर्धेसाठी राज्यातील विविध तंत्रनिकेतनमधील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल,कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थी बहुविध भविष्यवेधी तांत्रिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन करणार आहेत. विभागवार विषय पुढीलप्रमाणे- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ग्रुप (ई वेस्ट, स्मार्ट ग्रीड, ई व्हेईकल, वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, एप्लिकेशन्स ऑफ ए आय इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप (ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, अल्टरनेटिव्ह एनर्जी ऑप्शन्स,इंडस्ट्री 5.0, ए आय इन मॅन्युफॅक्चरिंग, सस्टेनेबल इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस) कॉम्प्युटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुप (इथिकल कन्सिडरेशन इन ए आय, इंटरनेट ऑफ थिंग्स इन स्मार्ट सिटीज , ब्ल्यू ब्रेन, 5G टेक्नॉलॉजी ऍण्ड इट्स इम्पॅक्ट, ए आर इन गेमिंग अँड एज्युकेशन).

मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ' ब्रीज मॉडेल '  विषयावर विविध संकल्पना मांडणार आहेत.

पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स विथ ए आय, ब्लू जीन, 5G वायरलेस टेक्नॉलॉजी विषयावर पेपर  प्रेझेंटेशन आणि एप्लीकेशन ऑफ ए आय, इंडस्ट्री 5.0, 6G वायरलेस टेक्नॉलॉजी, हायपरलूप , स्मार्ट सिटी विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन करणार आहेत.

अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या नवनवीन अभिनव कल्पनांना आणि भविष्यवेधी विचारांना व्यापक संधी देणारी ही स्पर्धा असून राष्ट्रीय स्तरावरील एक व्यापक मंच याद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तांत्रिक संकल्पना आणि विचार यांचे आदानप्रदान होऊन तांत्रिक क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या बदलांविषयी जागृती होणार आहे. 'इंपल्स २०२४'च्या कमालीच्या स्पर्धात्मक स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, ज्ञान आणि कौशल्य वृध्दी करण्याची संधी त्याद्वारे मिळणार आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार आहे .स्पर्धेचे समन्वयक प्रा. प्रवीण भट आणि इतर प्राध्यापक,कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.स्पर्धेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू असून पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी केले आहे.


डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन