बातम्या

डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देणार

Dr Radhakrishnan will give Diwali gift along with fifteen percent dividend to all the members


By nisha patil - 8/21/2023 4:41:29 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देण्याची घोषणा संस्थेचे सभापती मोहन वाघमारे यांनी जाहीर केले.ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

या सभेत पतसंस्थेचे सभापती मोहन वाघमारे यांनी अहवाल वाचन करून वर्षभरातील संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. मानद चिटणीस शरद शिरगावे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले. सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, व शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त घेणेत आलेल्या काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय देमाण्णा, सरचिटणीस अरविंद शेळके, सल्लागार अदिप पाटील, राजाराम लोखंडे, विद्या कांबळे, राजेंद्र पाटील , सेवा समितीचे अध्यक्ष प्रकाश केंगार यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे स्वागत व सूत्रसंचालन संतोष गुरव यांनी केले तर आभार उपसभापती अनिल कारंडे यांनी मानले.


डॉ. राधाकृष्णन शिक्षक- शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या सर्व सभासदाना पंधरा टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू देणार