बातम्या

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु

Dr Radhanagari Babasaheb Ambedkar Boys Govt Hostel Admission Started


By nisha patil - 12/7/2024 8:47:29 PM
Share This News:



 राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागास या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरु आहे. या वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन व महाविद्यालयीन वर्गाकरिता कार्यालयात वेळेत ऑफलाईन अर्ज जमा करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधिक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे.

      विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा निवासाची सोय, भोजनाची सोय, निर्वाह भत्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, छत्री रेनकोट भत्ता व इतर तत्सम बाबी मोफत पुरविल्या जातात. वसतिगृह प्रवेशासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 


राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु