बातम्या

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

Dr RadhanagariBabasaheb Ambedkar is a backward class Free admission to government hostels for children


By nisha patil - 3/6/2024 6:32:16 PM
Share This News:



राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक पदवी, डिप्लोमा वर्गातील विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत प्रवेश नोंदणी ऑफलाईन अर्ज कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे.

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, व्यायामशाळा, निर्वाह भत्ता, सहल भत्ता, स्टेशनरी भत्ता आदी सोयी-सुविधा विनामूल्य दिल्या जातात. वसतिगृह प्रवेशाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राधानगरी साई नगर, बेघर वसाहत, आय. टी. आय. शेजारी, राधानगरी येथे संपर्क साधावा.


राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु