बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट

Dr Rahul Awade s goodwill visit to BJP District President Rajvardhan Naik Nimbalkar


By nisha patil - 9/28/2024 10:01:07 PM
Share This News:



कोल्हापूर: ताराराणी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

भेटीप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी डॉ. राहुल आवाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. या चर्चेत ग्रामीण विकास, सहकार, आणि राजकीय स्थितीवर चर्चा झाली.

यावेळी ताराराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी नगरसेवक सुनिल पाटील, संचालक दादासो सांगावे, संचालक संजयकुमार कोथळी, संचालक गौतम इंगळे, संचालक सुकुमार किनिंगे, ताराराणी पक्षाचे युवा अध्यक्ष सतीश मुळीक आणि बबन मुरगुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांची भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट