बातम्या
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम
By nisha patil - 1/20/2025 9:55:01 PM
Share This News:
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम
कोल्हापूर, दि. 20: डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत वाचन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लेखक प्रा. युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी वाचनामुळे बुद्धीचा विकास होतो आणि वाचन संस्कृती टिकून राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय जोपासण्याचे महत्त्व सांगितले. पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, ग्रंथालय प्रमुख सीमा पाटील आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम
|