बातम्या

डॉ. संजय डी. पाटील यांचा ' नवरत्न'पुरस्काराने सन्मान

Dr Sanjay D Patil s Honored with Navratna award


By nisha patil - 9/15/2023 11:18:56 PM
Share This News:



डॉ. संजय डी. पाटील यांचा ' नवरत्न'पुरस्काराने सन्मान
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
-नवभारतची महाराष्ट्र फर्स्ट कॉनक्लेव्ह
 

कसबा बावडा/वार्ताहर उच्च शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्याहस्ते ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  "नवभारत"च्यावतीने मुबईत  आयोजित महाराष्ट्र फर्स्ट कॉनक्लेव्हमध्ये हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 "नवभारत" माध्यम समूहाच्यावतीने  वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे  या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी नवरत्न  पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभियांत्रिकी, वैद्यकीयसह उच्च शिक्षणातील  अमूल्य योगदानाबद्दल यावेळी डॉ संजय डी पाटील यांना उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी कसबा बावडा येथे 1984 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर डॉ. संजय डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 39 वर्षात या ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.  ग्रुपच्या विविध महाविद्यालयामार्फत  मेडिकल, पॉलीटेक्निक, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आदी विविध शाखामधील शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. शिक्षित पिढी घडवून राज्याच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. 


 


डॉ. संजय डी. पाटील यांचा ' नवरत्न'पुरस्काराने सन्मान