बातम्या
डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
By nisha patil - 4/24/2024 10:20:49 PM
Share This News:
कोल्हापूर/ प्रतिनिधी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या असीम योगदानाबद्दल “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या १३ व्या इंडियन एज्युकेशन समिटमध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
डॉ. संजय डी. पाटील हे ‘डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर’, ’डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे-कोल्हापूर’ आणि ’डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे’ या तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कृषी, व्यवस्थापन, फार्मसी, फिजीओथेरपी, हॉस्पिटॅलिटी आदी विविध क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या विविध ५० हून अधिक संस्थांचे डॉ. संजय डी. पाटील नेतृत्व करत आहेत. उत्तम अभियंते, डॉक्टर्स, पदवीधर घडवून देसाची आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डी. वाय. पाटील ग्रुपने मोठे योगदान दिले आहे. संशोधन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यावर विशेष भर दिला जातो. अत्याधुनिक कॅम्पस, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अन्य सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान पूरक अभ्यासक्रम, प्लेसमेंटवर विशेष लक्ष यामुळे डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संस्थेने विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जीवन गौरव’ पुरस्कारासाठी डॉ. पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. संजय पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, डॉ. एस. बी. पाटील, श्री. अमोल गाताडे, श्री. पी. डी. उके आदी उपस्थित होते.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
डॉ. संजय पाटील यांनी शिक्षण क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय शिक्षण सन्मान’, ‘विद्याभारती अवार्ड’, ‘कोहिनूर ऑफ इंडिया अवार्ड’, ‘राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार’, ‘नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवार्ड’, ‘भारत गौरव अवार्ड’, आखिल भारतीय तंत्र परिषदेचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी यापूर्वी गौरवण्यात आले आहे.
डॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
|