बातम्या
डॉ. संजय पाटील खास.धैर्यशील माने यांच्या बाबतीत नाराजी
By nisha patil - 2/4/2024 2:31:14 PM
Share This News:
डॉ. संजय पाटील खास.धैर्यशील माने यांच्या बाबतीत नाराजी
कोल्हापूर : प्रतिनिधी मी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. सगळ्यांना सोबत घेऊन कामही केले, आता भाजपात असलो म्हणून कोणी महत्व देणार नसेल तर चालणार नाही.
सन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही, असे म्हणत मयूर सहकारी उद्योग समूहाचे नेते डॉ. संजय के पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा होती.
खासदार धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपचे केंद्रीय रासायनिक खत मंत्रालयाचे संचालक, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष संजय पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांचे बंधू संजय पाटील तसेच भाजपचा घटक पक्ष असलेले मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते. अखेर महायुतीने पुन्हा धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवायचे ठरवलेले आहे.
डॉ. संजय पाटील खास.धैर्यशील माने यांच्या बाबतीत नाराजी
|