बातम्या
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची गरुड भरारी...
By nisha patil - 2/13/2024 7:29:28 PM
Share This News:
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंटच्या फोर इयर प्रोग्रामच्या चार विद्यार्थ्यांनी मुलाखत व कृती संशोधन प्रकल्प मध्ये आपला प्रवेश निश्चित करीत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या इतिहासात शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय मांडला.
महाराष्ट्रामध्ये इयत्ता सहावी व इयत्ता नववी इयत्तेसाठी अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये एकाच इन्स्टिट्यूट मधून इतके विद्यार्थी निवडले गेल्याने या विद्यार्थ्यांचे व श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुमारी निकिता वळीवडे, कु. सोहम लोया, कु.नील पाटील, व कुमारी यशलक्ष्मी पाटील या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या गौरवशाली निकालाची परंपरा कायम ठेवली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.ए.आर तांबे, समन्वयक श्री.एम.एस.पाटील, समन्वयिका सौ.सुप्रिया कौंदाडे, सौ संगीता पवार, श्री.अभिषेक तांबे, सौ.सृष्टी तांबे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची गरुड भरारी...
|