बातम्या

ब्लॅक पँथर पक्षाचे डॉ.सुनिल पाटील व शरद पाटील यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल

Dr Sunil Patil and Sharad Patil of the Black Panther Party filed their application for the Lok Sabha


By nisha patil - 4/20/2024 6:43:07 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुनिल पाटील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. शरद पाटील ( बहिरेवाडी, वारणा ) यांनी शेकडो पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
 

नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे मा. दिलीप पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते, मा. आनंदजी कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, मा. दिलीप रणदिवे, मा. बाळासाहेब कांबळे, मा. दिलीप खुडे, मा. उमेश कांबळे, मा. योसेफ तिवडे, सौ तनुजा भोसले, सौ पद्मा कांबळे, सौ शैला चंदनशिवे, सौ उज्वला चौगुले, सौ सारिका सुतार, इ. जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ब्लॅक पँथर पक्षाचे डॉ.सुनिल पाटील व शरद पाटील यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल