बातम्या

निर्व्यसनी युवक काळाची गरज डॉ. सुप्रिया देशमुख

Dr The need for an addiction free youth period Supriya Deshmukh


By nisha patil - 7/25/2023 6:51:23 PM
Share This News:



सायबर महाविद्यालय व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित युवक व व्यसनाधीनता या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी बोलताना सीपी आर हॉस्पिटलच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी वरील उद्गार काढले. सध्या युवकांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय असून व्यसनाधीनतेमुळे कमी वयात युवकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते जसे की कॅन्सर हायपर टेन्शन शुगर इत्यादी. खरे पाहता युवकांनी चांगल्या गोष्टींची सवय लावणे गरजेचे असून यातूनच चांगला समाज घडू शकतो असा असावा व्यक्त केला. कार्यशाळेची प्रस्ताविक नशाबंदी मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश सकटे यांनी नशाबंदी मंडळामार्फत राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे माहिती देऊन ही कार्यशाळा याचाच एक भाग असल्याचे नमूद केले. याप्रसंगी समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी समाज कार्य विभागाचे विद्यार्थी समाज विकासात कार्यरत असल्याचे सांगून त्यांनी व्यसनमुक्ती बाबत समाज जागृती करणे कर्मप्राप्त असल्याचे सांगितले. तर या प्रारंभीच्या सत्रात डॉ. बी. एम. हिर्डेकर माझी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ यांनी युवक व व्यसनाधीनता या विषयावर भाष्य करताना देश व विदेशातील उदाहरणे देऊन व त्यांनी वाईट व्यसनांपेक्षा वाचन व्यायाम चांगली मैत्री सकस आहार या या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलास एकंदरीत त्यांच्या व कुटुंबाच्या विकासाला हातभार लागेल असे नमूद केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डेक्कन व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अविनाश उपाध्ये यांनी व्यसनमुक्ती केंद्र मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सांगून व्यसनाधीनतेमुळे वैफल्यग्रस्तता वाढत असल्याचे सांगून हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी नवनिर्मितीकडे व पर्यायाने चांगल्या कृतीशील उपक्रमांना व उपक्रमात स्वतःला सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले. 

तर समारोप सत्रा मध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संस्थापिका डॉ. रेश्मा पवार यांनी व्यसनाधीनता हे कॅन्सर मागे प्रमुख कारण असू शकते असे नमूद करून सध्याच्या युगात बदललेल्या जीवनशैलीमुळे व व्यसनाधीनतेमुळे युवक जास्त प्रभावित होत असल्याचे नमूद करून या घटकांनी वेळीच सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तर अध्यक्ष स्थानांवरून बोलताना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री. विशाल लोंढे यांनी युवकांना आयुष्यात साध्य करण्यासाठी खूपश्या गोष्टी आहेत. असे असताना देखील बहुतांशी युवक व्यसनाधीनतेमुळे भरकटलेले आयुष्य जगत असून ही खेदाची गोष्ट असल्याचे नमूद केले. त्यांनी प्रामुख्याने युवक युवतींनी आयुष्यात मोठी ध्येय ठेवल्यास व्यसने करण्यास वेळ सापडणार नाही असे नमूद केले. 

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांचा हस्ते उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी सायबर चे व्यवस्थापकीय सचिव डॉ. रणजीत शिंदे, विश्वस्त सी. ए. ऋषिकेश शिंदे, संचालक डॉ. एस. पी. रथ व प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळुंखे यांचे सहकार्य लाभले. सी. पी. आर. हॉस्पिटल येथील क्रांती शिंदे व चारुशीला कणसे उपस्थित होत्या. या कार्यशाळेत सुमारे दीडशे हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी आपला सहभाग दर्शविला.


निर्व्यसनी युवक काळाची गरज डॉ. सुप्रिया देशमुख