बातम्या

जीवनामध्ये गणीताचे खुप महत्त्वाचे स्थान आहे - डॉ. विजयकुमार पाटील

Dr Vijay Kumar Patil


By nisha patil - 12/23/2023 4:48:04 PM
Share This News:



जीवनामध्ये गणीताचे खुप महत्त्वाचे स्थान आहे - डॉ. विजयकुमार पाटील

कोतोली- आपल्या भारतभूमीला फार प्राचीन काळापासून गणिती प्रतिभेचे वरदान लाभलेले आहे, प्रत्येकजण गणिताला खूप कठीण विषय समजतो, म्हणून प्रत्येकजण गणितापासून दूर पळतो, पण जर गणित नसेल तर आपले दैनंदिन जीवन सूरळीत चालू शकेल का?आपल्या सभोवती गणित आहे.मग गणित म्हणजे काय?
 

गणित विषयाबद्दल जी भिती किंवा अवघडपणा वाटतो आहे दूर व्हावा आणि गणित क्षेत्रातील कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे जीवनामध्ये गणिताचे खूप महत्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी केले.

येथील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात  गणित विभाग, ज्युनिअर सायन्स विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिन आणि वैदिक गणित या विषयावरील  पोस्टर प्रकाशन प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील बोलत होते.

 अध्यक्षस्थानी सचिव शिवाजीराव पाटील होते.

 कार्यक्रमास  डॉ.बी.एन.रावण, डॉ.यु.एन.लाड,

यावेळी ज्युनिअर सायन्सचे व बी.एस्सी.भाग -१,२ आणि ३ च्या विद्यार्थ्यांनी पोस्टरचे सादरीकरण केले.

फोटो ओळ -कोतोली - श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये गणित विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिन पोस्टर प्रकाशन प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील, सोबत शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते.


जीवनामध्ये गणीताचे खुप महत्त्वाचे स्थान आहे - डॉ. विजयकुमार पाटील