बातम्या
चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ विजयकुमार पाटील
By nisha patil - 12/15/2023 5:51:18 PM
Share This News:
कोतोली पैकी माळवाडी येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे शिवाजी विद्यापीठ प्राचार्य निवड समितीमार्फत डॉ.विजयकुमार आप्पासाहेब पाटील यांची प्राचार्य पदी निवड करण्यात आली.
प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील हे कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी,जि.सांगली येथे प्रभारी प्राचार्य म्हणून वीस वर्ष कार्यरत होते. पाटील सर हे एम.फील व पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पदवी प्राप्त केली आहे.प्राचार्य पाटील सर हे विविध विषयाचे गाडे अभ्यासक आहेत
त्यांनी आजपर्यंत शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून ,तसेच सांगली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये सदस्य म्हणून , पंचायत समिती,आटपाडी शालेय शिक्षण समन्वयक समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे.तसेच तालुका विधी सेवा समिती दिवाणी व फौजदारी न्यायालय,आटपाडी येथे सदस्य म्हणून काम केले आहे.
असे गाढे अभ्य्साक व प्रदीर्घ अनुभव असलेले प्राचार्यविजयकुमार पाटील हे चौगुले महाविद्यालयास लाभले आहेत त्यांच्या या नेमणुकीसाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,संस्था संचालक डॉ.अजय चौगुले व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
नुतन प्राचार्य डॉ. विजयकुमार आप्पासाहेब पाटील यांचे स्वागत करताना संस्था सचिव शिवाजीराव पाटील सोबत संस्था संचालक डॉ.अजय चौगुले,प्र.प्राचार्य डॉ.व्ही.पी.पाटील, मान्यवर उपस्थित होते.
चौगुले महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ विजयकुमार पाटील
|