बातम्या
सक्षम कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगी खारकांडे, उपाध्यक्षपदी अजय वणकुद्रे
By nisha patil - 1/4/2024 4:15:17 PM
Share This News:
कोल्हापूर : समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगी खारकांडे आणि उपाध्यक्षपदी विशेष शिक्षक अजय वणकुद्रे यांची रविवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली. सचिवपदी ॲड. अमोघ भागवत यांची फेरनिवड करण्यात आली.
स्टेशन रोडवरील प्रो ॲक्टिव्ह अकॅडमीच्या कार्यालयात कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात नवीन वर्षासाठी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत वार्षिक नियोजन, पदाधिकारी आणि प्रकोष्ठ प्रमुखांची निवड तसेच पुणे येथील राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत चर्चा झाली. सक्षमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या डॉ. शुभांगी खारकांडे या बीएएमएस असून त्यांनी पीजीडीपीसी अभ्यासक्रम डिस्टन्स एज्युकेशन मार्फत तसेच शिवाजी विद्यापीठाचा गार्डनिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. महावीर सेवाधाम संस्थेसाठी त्या काम करतात. उपाध्यक्षपदी निवड झालेले अजय वणकुद्रे महानगरपालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडे दृष्टिबाधित प्रकोष्ठ प्रमुख म्हणून तर सचिवपदी फेरनिवड झालेले ॲड. अमोघ भागवत यांच्याकडे ॲडव्होकसीची जबाबदारी देण्यात आली आहे. ते कोल्हापूर न्यायालयात वकीली करतात.
इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
विनोद पालेशा (कोषाध्यक्ष), सारिका करड़े (महिला विभाग), सचिन यादव (प्रचार प्रसार), अजय वणकुद्रे (दृष्टि), गणेश पोवार (श्रवणबाधित-प्रणव), संदिप आडनाईक (सहसचिव व बुद्धिबाधित-धीमहि), गिरीश करडे (रक्तबाधित-प्राणदा), ॲड. तुषार डोंगरे (शारीरिक निशक्तता-चरैवेति), डॉ. अंंजलीताई निगवेकर (कला विभाग), विवेक मोरे (क्रीड़ा विभाग) अजय मणियार ( रोजगार विभाग), सारिका करडे (अनुसंधान) ,संदीप रावळ (करवीर तालुका प्रमुख), सांगर कुंभार (हातकणंगले तालुका प्रमुख), तानाजी पोवार (शिरोळ तालुका प्रमुख), रतन गुरव (गड़हिंग्लज तालुका प्रमुख), तानाजी पाटील (भुदरगड तालुका प्रमुख), डॉ. चेतन खारकांडे (नेत्रपेढ़ी आणि कॉर्निया अंधत्व मुक्त भारत अभियान प्रकल्प प्रमुख), उपेंद्र सांगवडेकर (निधी संकलन), स्वाती करकरे आणि संतोष गाताडे कार्यकारिणी सदस्य.
सक्षम कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगी खारकांडे, उपाध्यक्षपदी अजय वणकुद्रे
|