बातम्या

आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

Dr from Azra Babasaheb Ambedkar Backward Classes Govt Hostel Free Admission


By nisha patil - 5/6/2024 5:06:04 PM
Share This News:



आजरा येथील आजरा साळगाव मार्गावरील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज वसतिगृहात जमा करावेत, असे आवाहन अधीक्षक केरबा पारदोळे यांनी केले आहे.

  वसतिगृहात आठवीपासून पुढे विद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सोई-सुविधा पुरविण्यात येतात. प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, जेवण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, व्यायामशाळा, निर्वाह भत्ता, सहल, स्टेशनरी भत्ता आदी सोयी-सुविधा विनामूल्य दिल्या जातात.


आजरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु