बातम्या

कोल्हापुरात भाजपकडून डॉ. राहुल आवाडे आणि अमल महाडिक यांची अधिकृत उमेदवारी जाहीर

Dr from BJP in Kolhapur Official candidature of Rahul Awade and Amal Mahadik announced


By nisha patil - 10/20/2024 11:54:10 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने महायुतीच्या वतीने डॉ. राहुल आवाडे (इचलकरंजी) आणि अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण) यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवडणूक विजयासाठी आशीर्वाद घेतले.

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दक्षिण मध्ये अमल महाडिक व ऋतुराज पाटील यांच्यात सामना रंगाची शक्यता असून आगामी काळात या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये विधानसभे निवडणुकीची जोरदार टक्कर होण्याची चर्चा आतापासूनच रंगली आहे.


कोल्हापुरात भाजपकडून डॉ. राहुल आवाडे आणि अमल महाडिक यांची अधिकृत उमेदवारी जाहीर