बातम्या
डॉ.कृष्णदेव गिरी यांचे पोलिसांकरिता योग शिबीर व ध्यानातून आत्मज्ञानाकडे' व्याख्यान
By nisha patil - 6/20/2024 8:22:02 PM
Share This News:
जागतिक योग दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिसांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची-तासगांव, जि. सांगली येथील महाराष्ट्र पोलिसांच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात सत्र क्रमांक ०९ सुरु असुन त्या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून पोलीस दलात भरती झालेले ६०९ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असुन त्यांना दि. २१/०६/२०२४ रोजी जागतिक योग दिना निमित्त, महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागामधून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले जागतिक दर्जाचे योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी यांचे सकाळच्या पहिल्या सत्रात शासकीय योग प्रोटोकॉल आणि मार्शल योगातील १६ टेबलमधून २५२ योग-व्यायामाचे प्रकार, सूर्यनमस्कार आणि ३२ अंकी सूर्य आणि चंद्र नमस्कार योग शिबिरात घेतले जाणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या ध्यानातून आत्मज्ञानाकडे व्याख्यान/ प्रवचन पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आयोजित केले आहे. अशी माहिती माननीय श्री सुजय घाटगे, उपप्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची यांनी दिली.
डॉ.कृष्णदेव गिरी यांचे पोलिसांकरिता योग शिबीर व ध्यानातून आत्मज्ञानाकडे' व्याख्यान
|