विशेष बातम्या
डॉ. संजय डी. पाटील यांचा 61 वा वाढदिवस उत्साहात साजरा
By nisha patil - 2/18/2025 8:23:06 PM
Share This News:
कोल्हापूर – डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा 61 वा वाढदिवस मंगळवारी कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीय, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. कुटुंबीयांनी औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षण, कृषी सहकार आणि इतर विविध क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉ. पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी आशीर्वाद दिला. केक कापण्याच्या कार्यक्रमात सौ. वैजयंती पाटील, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि इतर कुटुंबीयांनी आनंद साजरा केला.
विविध क्षेत्रातील मान्यवर – माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रकाश आवाडे, डॉ. सुजित मिणचेकर, नावेद मुश्रीफ, डॉ. ए. एन. जाधव, अरुण डोंगळे, इ. – यांनीही उपस्थित राहून दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
डॉ. संजय डी. पाटील यांचा 61 वा वाढदिवस उत्साहात साजरा
|