बातम्या

फ्रिजऐवजी प्या माठातील पाणी,’हे’आहेत फायदे!

Drink Matha water instead of fridge these are the benefits


By nisha patil - 11/3/2024 7:29:23 AM
Share This News:



प्राचीन काळापासून मातीची भांडी वापरली जात आहेत. मातीमधील जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वांमुळे आपले पूर्वज या भांड्यांचा वापर मोठ्याप्रमाणात करत होते. प्रगत काळात मातीच्या भांड्यांचा वापर अतिशय कमी अथवा पूर्णता बंद झाला आहे. यामुळे अशा भांड्यांतून मिळणारी जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वांना आपण मुकत आहोत. सध्याच्या काळात आपण मातीची भांडी वापरू शकत नसलो तरी किमान मातीच्या माठातील पाणी पिणे सहज शक्य आहे. याचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

अल्कलाईन
शरीरातील अ‍ॅसिडिक घटकांमुळे विविध आजार होतात. शरीराच्या आतील वातावरण अ‍ॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आरोग्य चांगले राहते. माती ही नैसर्गिक अल्कलाईन असल्याने मातीच्या माठातील पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.


रसायनमुक्त पाणी
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हानिकारक बीपीए केमिकल असल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी माठातील पाणी जास्त आरोग्यदायी आहे. सरत मातीचे गुणधर्म मिसळल्याने ते अधिक आरोग्यदायी होते.

उष्माघात
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी मातीच्या माठातले पाणी अतिशय उपयुक्त आहे.

घशासाठी उपयुक्त
सर्दी, खोकला आणि अस्थमाचा त्रास असल्यास माठातील थंड पाणी पिऊ शकता. हे पाणी घशासाठी चांगले असते.

नैसर्गिक गारवा
मातीच्या माठाला असलेल्या लहान छिद्रांमुळे यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. यातून नैसर्गिक गारवा मिळत असल्याने फ्रिजऐवजी माठातील पाणी प्यावे. फ्रिजमधील अतिथंड पाण्याने विविध व्याधी होऊ शकतात.

मातीत उपयुक्त घटक
मातीत भरपूर मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असल्याने माठातील पाण्यात हे घटक मिसळतात. यामुळे शरीराला फायदा होतो.

मेटॅबॉलिझम सुधारते
मातीच्या मोठातील पाणी प्यायल्याने मेटॅबॉलिझम सुधारते. यामुळे आरोग्य चांगले राहते.


फ्रिजऐवजी प्या माठातील पाणी,’हे’आहेत फायदे!