बातम्या
पावसाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी प्या आयुर्वेदिक चहा, मिळेल स्वाद आणि आरोग्य
By nisha patil - 7/17/2023 7:27:31 AM
Share This News:
एक कप चहा पावसाळ्यात आरामदायी वाटतो. शरीराचे तापमान स्थिर ठेवतो आणि हवामानाशी संबंधित अॅलर्जी आणि सर्दीपासून बचाव करण्यास मदत करतो.आयुर्वेदिक चहा आरोग्यासाठी विशेषतः पावसाळ्यात खूप चांगला मानला जातो. या काळात आयुर्वेदिक चहाचे अनेक प्रकार आहेत जे या ऋतूत पिऊन आनंद घेऊ शकता. हा चहा इम्युनिटी वाढवतो, निरोगी ठेवतो.
१. ग्रीन टी –
ग्रीन टीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या चहामधील हाय अँटिऑक्सिडेंट सामग्री इम्युनिटीसाठी उपयोगी आहे. पावसाळ्यात इम्युनिटी वाढवून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येतो. ग्रीन टी शरीरातील प्रदूषक तत्व बाहेर टाकतो.
२. आल्याचा चहा –
पावसाळ्यात आल्याच्या चहाचा एक घोट मूड फ्रेश करू शकतो. तो अॅलर्जी कमी करतो, घसा साफ करतो आणि सामान्य सर्दीवर उपचार करतो. तसेच, पोटाशी संबंधित समस्या दूर करतो. आल्याचा चहा शोषण आणि पचन करण्यास मदत करतो.
३. कॅमोमाइल चहा –
या चहामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे पावसाळ्यात उपयुक्त ठरतात. कारण या ऋतूमध्ये त्वचेच्या गंभीर समस्यांसह सर्दी, फ्लू, वायरल सारखे अनेक संसर्गजन्य रोग येतात. अशावेळी हा चहा खूप प्रभावी ठरतो.
४. तुळशीचा चहा –
तुळशीच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी, ताप आणि तणावात आराम मिळतो.
तुळशीचा चहा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. पचन आणि त्वचेला फायदा होतो.
५. पुदिन्याचा चहा –
पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, मेन्थोन आणि लिमोनेन यासह अनेक आवश्यक तेल असतात,
जे भिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान बाहेर पडते. पुदिना चहाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या कमी होतात.
डोकेदुखी, नाक बंद होणे आणि हंगामी अॅलर्जीपासून आराम मिळतो.
पावसाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी प्या आयुर्वेदिक चहा, मिळेल स्वाद आणि आरोग्य
|