बातम्या

थंडीत प्या लवंगयुक्त चहा, होतील हे 7 जबरदस्त फायदे…

Drink clove tea in the cold


By nisha patil - 1/3/2024 7:39:37 AM
Share This News:



गरम पदार्थांचे नाव घेताच थंडीत चहा आठवतो. अनेक लोक आले, वेलची टाकून चहा घेतात. परंतु, लवंग टाकून घेतलेला चहा थंडीत सर्वात लाभदायक असतो. कारण लवंगेत उष्ण गुणधर्म असतो. यामुळे थंडीच्या दिवसात लवंगयुक्त चहा पिणे लाभदायक मानले जाते. या चहाचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

1 लवंग गरम असल्याने थंडीत याचा चहा 2-3 वेळा घेतल्यास सर्दी दूर होते.


2 सायनसच्या रूग्णांनी गरमागरम लवंगयुक्त चहा घेतल्यास त्यांना अधिक फायदा होतो. लवंगेतील इजेनॉल कफ दूर करते. शरीराला उष्णता मिळते, ज्यामुळे सायनसमध्ये आराम मिळतो.

3 तापावर लवंगयुक्त चहा खुप गुणकारी ठरते. यामुळे ताप जातो.

4 थंडीत अनेकांना सांधेदुखी होते. मांसपेशीमध्ये होणार्‍या दुखण्यातून आराम मिळवण्यासाठी लवंगयुक्त चहा प्यावा.

5 अ‍ॅसिडीटी असल्यास लवंगयुक्त चहा प्या.

6 दाताच्या दुखण्यातही हा चहा उपयुक्त ठरतो.

7 लवंगेतील अँटी-इन्फ्लेमेंटरी गुण आतड्यातील बॅक्टेरियांना नष्ट करतो. यामुळे पोटाचे दुखणे, आणि पोटाशी संबंधीत समस्या नष्ट होतात.


थंडीत प्या लवंगयुक्त चहा, होतील हे 7 जबरदस्त फायदे…