सकाळी झोपेतून उठताच प्या मेथीचं पाणी

Drink fenugreek water as soon as you wake up in the morning


By nisha patil - 5/30/2023 9:01:28 AM
Share This News:



स्पीड न्यूज लाईव्ह २४ वेब टीम :भारतातील प्रमुख मसाल्यांमध्ये स्थान असणाऱ्या मेथीची हिरवी पालेभाजीही आवडीने खाल्ली जाते. याच्या बीयांचा वापर भाज्यांना तडका देण्यासाठी आणि इतरही पदार्थांमध्ये केला जातो. याने भाज्यांची किंवा पदार्थांची टेस्ट वाढते.


मेथीची टेस्ट तर चांगली असतेच मात्र याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना अजिबात माहीत नसतात. ज्या लोकांना रात्री संडास येण्याची समस्या होत असेल त्यांच्यासाठी ही मेथी फारच फायदेशीर ठरते. तसेच मेथीच्या बीयांचं सेवन करून तुम्ही झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर करू शकता.

घरगुती उपाय

मलावरोध म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत पाणी उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.

मेथीचे इतरही फायदे

ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांना मेथीच्या पाण्याने आराम मिळेलच, सोबतच याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल होतं कमी

मेथीच्या बीयांचं या रूपात केल्या गेलेल्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हललाही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, डायबिटीसची समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो.

फुप्फुसाची समस्या होते दूर

त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.


सकाळी झोपेतून उठताच प्या मेथीचं पाणी