बातम्या
हिवाळ्यात प्या चहाचे हे ५ प्रकार, तुमचे शरीर ठेवते गरम
By nisha patil - 1/17/2024 7:30:17 AM
Share This News:
साधारणपणे हिवाळ्यात, साधा दूधाचा चहा लोक पितात. ज्यामध्ये आले किंवा वेलची घालतात. पण हिवाळ्यात चहाचे काही वेगळे प्रकारही करू शकता. या चहाच्या मदतीने शरीर उबदार ठेवू शकता. यामुळे प्रतिकारशक्तीही सुधारते. या सर्वोत्तम हर्बल टीबद्दल जाणून घेऊया…
१. गुळाचा चहा :
हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साखरेऐवजी चहामध्ये गूळ वापरू शकता. गुळाचा प्रभाव उष्ण असतो. ज्यामुळे शरीर उबदार राहते.
२. मसाला चहा :
हिवाळ्यात गरमागरम मसाला चहा पिण्याची मजा काही औरच असते. मसाला चहामध्ये दालचिनी, काळी मिरी, आले, तुळस, लवंग यासारखे इतर मसाले वापरू शकता. तसेच बाजारातून मसाला चहा देखील घेऊ शकता. मसाला चहा प्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी आणि खोकल्यासाठी देखील तो खूप फायदेशीर आहे.
३. दालचिनी आणि तुळस चहा :
हिवाळ्यात दालचिनी आणि तुळशीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. यामुळे शरीर निरोगी राहते. संसर्गापासून संरक्षण होते. हा चहा बनवण्यासाठी १ दालचिनी आणि ५-६ तुळशीची पाने घ्या. २ ग्लास पाणी घ्या आणि त्यात दालचिनी आणि तुळस घाला. यानंतर, पाणी अर्धे होईपर्यंत चांगले उकळवा. दुधाच्या चहामध्ये मिक्स करू शकता.
४. अश्वगंधा चहा :
अश्वगंधाचे मूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते. तणाव कमी होतो.
दुधाच्या चहामध्ये अश्वगंधा घालू शकता. २ ग्लास पाण्यात अश्वगंधाचा ३-४ इंच तुकडा टाका.
पाणी १ ग्लास पर्यंत कमी होईपर्यंत ते उकळवा. ते गाळून सेवन करा.
५. ज्येष्ठमध चहा :
हिवाळ्यात ज्येष्ठमधचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. आरोग्य सुधारण्यासाठी ज्येष्ठमध चहा पिऊ शकता.
सामान्य दुधाच्या चहामध्ये ज्येष्ठमध टाकू शकता. तसेच ज्येष्ठमध पाण्यात उकळून पिऊ शकता.
यामुळे शरीर उबदार राहते.
हिवाळ्यात प्या चहाचे हे ५ प्रकार, तुमचे शरीर ठेवते गरम
|