बातम्या
दररोज ‘हा’ चहा प्या अन् वजन कमी करा, केस आणि त्वचाही होईल चमकदार
By nisha patil - 1/26/2024 7:32:29 AM
Share This News:
तुला वजन कमी करायचं, आधी चहा पिणे बंद कर, असे अनेकजण आपल्याला सांगत असतात. पण चहा आणि वजनाचा काय संबंध? चहा हे लिक्विड ड्रिंक आहे, त्यामुळे वजन वाढू शकते का? बरेच लोक वजन कमी करण्याच्या इच्छेशिवाय चहा पिणे बंद करतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फक्त त्यासाठी ध्येय ठेवा. जर तुम्ही रोज सकाळी एक कप चहा प्यायला तर तुम्हाला काही महिन्यांतच फायदे दिसतील. एवढेच नाही तर केस आणि त्वचेसाठी हे फायदेशीर आहे.
लेमनग्रास चहा पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असे गुणधर्म आहेत जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे अन्न पचवण्याची प्रक्रिया कार्यक्षम ठेवते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. लेमनग्रास चहा तुमचे पोट स्वच्छ ठेवते आणि पोट फुगणे, आम्लपित्त, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम देते. हा चहा उलट्या, जुलाब आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा चहा पचनाच्या आजारावर खूप फायदेशीर आहे
दररोज ‘हा’ चहा प्या अन् वजन कमी करा, केस आणि त्वचाही होईल चमकदार
|