बातम्या
रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे
By nisha patil - 12/3/2024 7:26:14 AM
Share This News:
रोज सकाळी कोमट पाणी नियमित प्यायल्यास होणारे फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते आणि यासोबतच अनेक आरोग्य समस्या दूर होतात. कोमट पाणी पिण्याचे कोणते दहा फायदे आहेत त्याविषयी माहिती घेऊयात.
रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. तसेच शरीरामधील अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते. जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होते. घामाच्या माध्यमातून त्वचेमधील घाण बाहेर पडते. स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते.
कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी-पडशाची समस्या दूर होते. घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते. रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू आखडतात आणि वेदना होतात. शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो.
रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे
|