बातम्या
सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्याने मिळतात हे मोठे फायदे
By nisha patil - 6/12/2023 7:25:36 AM
Share This News:
हेल्दी राहण्यासाठी नेहमीच हेल्थ एक्सपर्ट्स दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देतात. यात पोट, त्वचा आणि केसांची वाढ चांगली होते. त्याशिवाय कोमट पाणी पिण्याचे अनेक लाभ असतात.
अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे काय फायदे होतात.
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे
1) सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमची हाडे मजबूत होतात. तसेच याने शरीरातील न पचलेले पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते. सोबतच त्वचा चांगली राहते. इतकंच नाही तर जॉइंट्समध्ये होणारी वेदनाही दूर होते. याने चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो.
2) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट राहतं. डिटॉक्ससाठीही तूपाचं सेवन फार चांगलं मानलं जातं. तेच रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने वजन वेगाने कमी होतं. त्यासोबतच तुमची शुगर लेव्हलही नियंत्रित राहते.
3) तूपामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, ओमेगा-3, ओमेगा-9, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ए, के, ई त्याशिवाय यात व्हिटॅमिन सी व ब्यूटीरिक अॅसिडही असतं. हे सगळे तत्व तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.
सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्याने मिळतात हे मोठे फायदे
|