बातम्या
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने पोट राहिल चांगलं
By nisha patil - 3/15/2024 7:20:51 AM
Share This News:
दह्यापासून बनवलेल्या लस्सीमध्ये चांगले बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात. यामुळेपचनक्रिया सुधारते. यामुळे सेवन केलेल्या अन्नातील पोषक घटक शरीरात योग्यप्रकारे शोषले जातात. चांगल्या बॅक्टेरियांच्या मदतीनं आतडे निरोगी राहते व मूडही चांगला राहतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही चांगली राहते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित लस्सी पिणं फायदेशिर ठरते. लस्सीत प्रोटिन्स असल्याने पोट भरलेलं राहतं आणि दुसरं काही खाण्याची इच्छा होत नाही. लस्सीमध्ये चवीसाठी जिरं, हळद आणि आलंही टाकता येते. यामध्ये इन्फ्लेमेटरी घटक असल्याने लस्सीची चव वाढतेच, शिवाय आरोग्यदायी गुणधर्मही वाढतात. इन्फ्लेमेशनची समस्या असलेल्यांनी लस्सीचं सेवन करावं. तसेच लस्सीत फळंही टाकता येऊ शकतात. यामुळे लस्सीतून अँटिऑक्सिडंट घटक मिळतील. शरीराला अँटिऑक्सिडंट मिळाल्यानं त्वचा निरोगी राहून ताजेतवाने वाटते.
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्याने पोट राहिल चांगलं
|