बातम्या

मुगाच्या डाळीचं पाणी पिणं हा उत्तम डिटॉक्स उपाय आहे.

Drinking mung bean water is a great detox solution


By nisha patil - 3/26/2024 9:39:32 AM
Share This News:



शरीराला ताकद देण्यासोबतच वजन घटवण्यास फायदेशीर. पोटाच्या आणि मेंदुच्या आरोग्यासाठी हे पाणी रोज पिणं उत्तम मानलं जातं.मोठ्यांनी आपल्या आहारात रोज मूग डाळीच्या पाण्याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यासोबतच आरोग्याचे अनेक प्रश्न सुटतात.सर्व डाळींमधे मुगाची डाळ ही अधिक पौष्टिक आणि आरोग्यास फायदेशीर असते. त्यामुळेच मुगाच्या डाळीला डाळींमधली राणी म्हटलं जातं. रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम मुगाची डाळ करते. मुगाच्या डळीत प्रथिनं, कबरेदकं आणि फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळेच मुगाची डाळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. पण मुगाची डाळच नाही तर मुगाच्या डाळीचं पाणी हे देखील आरोग्यास फायदेशीर असून वजन कमी करण्यात मदत करणारा परिणामकारक उपाय आहे.मुगाच्या डाळीचं पाणी का प्यावं?  रोज मुगाच्या डाळीचं पाणी पिल्यास शरीरात जमा झालेले अशुध्द आणि विषारी घटक बाहेर पडतात. शरीर डिटॉक्स करायला मुगाच्या डाळीच्या पाण्याचा उपयोग होतो.

 मुगाच्या डाळीचं पाणी पिल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच शरीरातील पारा, शीशे यासारखे जड धातू बाहेर पडतात.

मुगाच्या डाळीच्या पाण्यातून शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम मिळतं. तसेच क जीवनसत्त्वं, कबरेदकं आणि प्रथिनंही असतात.

 मुगाच्या डाळीचं गरम पाणी थोडं साजूक तूप घालून पिल्यास चव तर छान लागतेच शिवाय शरीराचं पोषणही होतं.मूग डाळीचं पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करतं. शिवाय ऊन लागल्यानं जाणवणारी अस्वस्थता मुगाच्या डाळीचं पाणी पिल्याने जाते. शरीरातला गळवाटा जाऊन ऊर्जा मिळते.

 वाढलेलं वजन कमी करण्याचा पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे मुगाच्या डाळीचं वाटीभर गरम पाणी रोज प्यावं. या उपायानं शरीरात कमी उष्मांक जातात आणि तरीही पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वाटीभर मुग डाळीचं पाणी पिल्यास शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते.
 सकाळ संध्याकाळ मुगाच्या डाळीचं एक वाटी पाणी पिणं लाभदायक असतं. मूग डाळीचं पाणी पचण्यास हलक असतं. पोटाच्या आणि मेंदुच्या आरोग्यासाठी हे पाणी रोज पिणं उत्तम मानलं जाते. कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारातउपयुक्त असणाऱ्या मूगाचे फायदे
शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी.

मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे मिळतात. हिरवा मूग सर्वश्रेष्ठ आहे. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात.  ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरांत ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढामूग खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सर्व प्रकारच्या डाळींमधून आपल्याला प्रथिने मिळतात. मूगामध्ये भरपूर पोषक असतात. व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन-सी, लोह, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फॉस्फरस, फोलेट, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, नियासिन आणि थायामिन यांसारखे अनेक पोषक घटक त्यात आढळतात. रात्रभर भिजवलेले मूग सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मूग खाण्याचे खूप फायदे आहेतशरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे.

भिजवलेले मूग रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वास्तविक, त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक रोग आणि संक्रमणांपासून स्वत:चा बचाव करू शकता.भिजवलेले मूग रिकाम्या पोटी खाणे पोटासाठी फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ते पचन सुधारण्याचे काम करते. याच्या वापराने आतड्यांची हालचाल सुधारते. त्यामुळे पोट सहज साफ होते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्यांवर मात करता येते.


मुगाच्या डाळीचं पाणी पिणं हा उत्तम डिटॉक्स उपाय आहे.