बातम्या
आरोग्यासाठी ‘ब्लड ग्रुप’ नुसार चहा पिणे लाभदायक !
By nisha patil - 9/3/2024 7:27:17 AM
Share This News:
ब्लड ग्रुपनुसार डायट घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. तसेच आपल्या ब्लड ग्रुपनुसार चहा प्यायल्यास अनेक आजारांचा धोका टाळता येऊ शकतो, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या संशोधनात सिध्द झाले आहे. कोणत्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीने कसा चहा प्यावा आणि त्याचे फायदे काय होतात हे फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्टने सांगितले आहे.
ब्लड ग्रुपनुसार चहा निवडताना फक्त ब्लड टाइप महत्वाचा आहे. उदाहरणार्थ ‘ओ’ ब्लड ग्रुपच्या सर्व लोकांनी एकाच प्रकारचा चहा घ्यावा. ब्लड ग्रुप ओ पॉझिटव्ह आहे की निगेटिव्ह याने फरक पडत नाही. हा नियम प्रत्येक ब्लड ग्रुपसाठी लागू होतो.
* A ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतात. यासाठी त्यांनी डोके शांत ठेवण्यासाठी ग्रीन टी किंवा ओव्याचा चहा प्यावा.
* B ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या लोकांचे वजन लवकर वाढते आणि त्यांना थकवा लवकर येतो. यासाठी त्यांनी लेमन टी, ग्रीन टी किंवा तेजपत्त्याचा चहा प्यावा. यामुळे थकवा कमी होतो, वजन कमी करण्यास उपयोगी आहे.
* AB ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपचे लोक हसमुख असतात परंतु त्यांच्यामध्ये अॅक्टिव्हनेस कमी असल्याने त्यांनी साधा चहा प्यावा आणि कॉफी पिणे टाळावे.
* O ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या लोकांना पोटाची समस्या जास्त असते. म्हणून यांनी साधा किंवा अद्रकचा चहा प्यावा. हे पोटासाठी फायदेशीर असते.
आरोग्यासाठी ‘ब्लड ग्रुप’ नुसार चहा पिणे लाभदायक !
|