बातम्या
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी
By nisha patil - 7/23/2024 9:34:51 PM
Share This News:
जिल्ह्यात दिनांक २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय हे सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता असून दौ-या दरम्यान संरक्षित व्यक्तिंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सावित्री मिनरल वॉटर प्लांट ऑफ सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था, शोभाताई कोरे वारणानगर, महिला गृह उद्योग लिज्जत पापड ब्रँच वारणानगर कोडोली, विमानतळ, श्री अंबाबाई/ महालक्ष्मी मंदीर, शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी घातली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी
|