बातम्या

ड्रग्स क्विन बेबी पाटणकरचा व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा

Drug queen Baby Patankar cheated the businessman of two crores


By nisha patil - 9/15/2023 8:08:38 PM
Share This News:



 ड्रग क्वीन शशिकला पाटणकर  उर्फ बेबी पाटणकरचा नवा कारनामा समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या बेबी पाटणकरनं आपल्या साथीदाराच्या मदतीनं एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. किरीट चौहान या व्यापाऱ्याची बेबी पाटणकरनं दोन कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणुकीप्रकरणी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ड्रग्स तस्करीनंतर बेबी पाटणकरचा आता फसवणुकीचा धंदा समोर आला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या बेबी पाटणकरच्या कूकर्म अजून काही थांबली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आपल्या साथीदाराच्या मदतीनं बेबीनं एका व्यापाऱ्याला थोडं थोडकं नव्हे तर तब्बल दोन कोटींना फसवलं आहे. किरीट चौहान नावाच्या व्यापाऱ्याची स्वस्तात सोने देतो असं सांगून केली दोन कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेली शशिकला पाटणकर उर्फ बेबी पाटणकर उर्फ बबी आंटी ही आता एका फसवणुकीच्या प्रकारात चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेलं सोनं स्वस्तात देतो सांगून पाटणकर आणि तिच्या साथीदारानं एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. तक्रारदार किरीट सुरेश चौहान या 60 वर्षीय व्यापाऱ्यानं दोन कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांता दाखल केली आहे. चौहान यांच्या तक्रारीवरुन वरळी पोलिसांनी भादवी कलम 420 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम रामकिसन मुंडे 45 आणि शशिकला रमेश पाटणकर उर्फ बेबीं पाटणकर या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. 


तक्रारदार किरीच चौहान यांची एका परिचयाच्याच व्यक्तीनं परशुराम मुंडे याच्याशी भेट करून दिली. मुंडे यांनी त्याची आर. आर. गोल्ड प्रा. लिमी. नावाची कंपनी पुणे येथे असल्याचं सांगून ते सोनं खरेदी विक्री करत असल्याबाबत सांगितलं. कस्टम येथे पकडलेलं सोनं ते लिलावात कमी भावात खरेदी करून बाजार भावापेक्षा कमी भावात विकतात, असंही आरोपी मुंडेनं सांगितलं.

वरळी येथील भिवंडीवाला बिल्डींगमध्ये मुंडे व्यापाऱ्याला बेबी पाटणकरच्या घरी घेऊन गेले आणि बेबी पाटणकरसोबत भेट करुन दिली. पाटकरनं व्यापाऱ्याला सात किलो सोनं दाखवलं. त्यानुसार व्यापाऱ्यानं आधी सुमारे एक कोटी 30 लाख रुपये दिले आणि नंतर 70 लाख रूपये दिले. दुसऱ्या दिवशी सोनं देते सांगून दोन्ही आरोपी पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापाऱ्यानं तात्काळ पोलिसांत धाव घेतली.


ड्रग्स क्विन बेबी पाटणकरचा व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा