बातम्या
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तयार होणारे ड्रग्ज हे कुरिअरच्या माध्यमातून लंडनमध्ये
By nisha patil - 2/22/2024 7:30:25 PM
Share This News:
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तयार होणारे ड्रग्ज हे कुरिअरच्या माध्यमातून लंडनमध्ये
पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून पुण्यात तयार झालेले मेफेड्रॉन हे थेट लंडनमध्ये पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. एमडी ड्रग्सची कुरकुंभमध्ये निर्मिती झाली तर त्याची सेवा लंडनमध्ये पुरवण्यात आल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. रेडी टू इट फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्स लंडनमध्ये पोहोचवण्यात आलं आहे.
कुरकुंभ एमआयडीसीमधील कारखान्यातील मुद्देमाल दिल्लीत आणि तिथून लंडनला कुरिअर करण्यात आला आहे. दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर लंडनला ड्रग्ज पाठवण्याची जबाबदारी होती. यापैकी भुटीया आणि कुमार हे दोघेही फूड कुरिअरचा व्यव्यसाय करत होते.
आतापर्यंत दिल्लीतून लंडनमध्ये 4 पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांत पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून जप्त केलेल्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची किंमत तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. देशातील विविध शहरात ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या माफियांचे धागेदोरे पुण्याशी संबंधित असल्याच या कारवाईतून समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पुण्यात या मेफेड्रॉनच्या विक्रीतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी राहिल्याच स्पष्ट झालंय.विश्रांतवाडीत सापडलेल मेफेड्रॉन दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या केमिकल कंपनीत तयार झाल्याच पोलिसांना समजलं. या कंपनीवर छापा टाकला असता आणखी बाराशे कोटी रुपयांचं मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केलं आणि अनिल साबळे या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आलीईईज खुल घ्या.
साबळेच्या या कंपनीत मेफेड्रॉन तयार करण्याच काम करत होता युवराज भुजबळ नावाचा सायंटिस्ट. एमएसस्सी केमिस्ट्री असलेल्या या सायंटिस्टला देखील मुंबईतून अटक करण्यात आली. कुरकुंभमधल्या या ड्रगच्या कारखान्यातून दिल्लीमधे मेफेड्रॉन पाठविण्यात आल्याचं समोर आल्यावर पुणे पोलीस दिल्लीत पोहचले. त्यानंतर दिल्लीतील दोन ठिकाणाहून चौदाशे कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं. याच माहितीच्या आधारे सांगलीमधे देखील छापेमारी करून मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं.
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तयार होणारे ड्रग्ज हे कुरिअरच्या माध्यमातून लंडनमध्ये
|