बातम्या

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहणी गळतीमुळे पाचगावात पाण्याचा ठणठणात ; पाण्यामुळे नागरिक झाले बेहाल

Due to leakage of water supply pipes water stagnated in Pachgaon


By nisha patil - 12/22/2023 1:42:36 PM
Share This News:



पाचगाव : मागील आठवड्यांपासून पाचगाव गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरगाव योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्याने परिसरात सहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणात पडला आहे. त्यामुळे महिला वर्गातून अक्षरशः नाराजी व्यक्त होत आहे. 
   

तासगावातील वटवृक्ष कॉलनी, महालक्ष्मी पार्क, ऋषिकेश पार्क, राम मंदिर परिसर व पवार कॉलनी या परिसरात गिरगाव योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील पाणीपुरवठा गळतीमुळे बंद झाली आहे. स्थानिकांनी ंनी इतर ठिकाणाहून पिण्याच्या पानाची सोय करावी लागत आहे. तर खर्चाच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचं म्हणणं आहे, सरपंच, ग्रामपंचायतीने याबाबत लक्ष घालून टँकरद्वारे तरी पाण्याची सोय करावी.  संबंधित विभागाशी संपर्क साधला असता गळती करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.जेव्हा गळती काम पूर्ण होईल तेव्हा पाणी पुरवठा पूर्ववत होईल.


पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहणी गळतीमुळे पाचगावात पाण्याचा ठणठणात ; पाण्यामुळे नागरिक झाले बेहाल