बातम्या

‘गांधीनगर’ योजनेमुळे पुढील ३० वर्षे मिळणार मुबलक पाणी- आमदार ऋतुराज पाटील

Due to the Gandhinagar scheme  we will get abundant water for the next 30 years  MLA Rituraj Patil


By nisha patil - 3/8/2023 6:22:16 PM
Share This News:



 तेरा गावांच्या सुधार गांधीनगर नळ पाणी योजनेच्या माध्यमातून पुढील तीस वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार आहे, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. ३४४ कोटीच्या गांधीनगर नळ योजनेंतर्गत उचंगाव येथे  करण्यात येणाऱ्या पाईपलाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 

    आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे करवीर तालुक्यातील १३ गावांसाठी ३४४ कोटींची गांधीनगर नळ योजना मंजूर करून आणली. या योजनेंतर्गत उंचगाव गावातील पूर्व भागातील शांतीनगर, नऊ नंबर या भागात पाईपलाईन कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

   यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, या भागातू निवडून आल्यानंतर प्रथम पाण्याचा प्रश्न पहिला हाती घेतला. सुरुवातील २३८ कोटींची ही योजना होती. मात्र त्यामुळे ग्रामपंचायतवर पाईपलाईनचा अतिरिक्त भार पडणार होता, त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून या योजनेसाठी ३४४ कोटी निधी मंजूर करून घेण्यात आला.  या योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

  उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी वर्षभर मंत्रालयात पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून आणली. सध्या या भागात २ - ३ दिवसातून पाणी येते.  सध्या १३ लाख लिटर पाण्याची आवक आहे, ती वाढून ६० लाख लिटर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. 

  यावेळी गोकुळ संचालक बाबासो चौगुले, प्रकाश पाटील, पसरपंच विराग करी, गा. पं. सदस्य राहुल मोळे, संदीप पाटील, तुषार पाटील, अरविंद शिंदे, सदस्या शीला मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुरज पाटील, विनायक हावळ, महेश जाधव, रवी काळे, डॉ. शरद शिंदे, उमेश पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता संजय चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार वाय.व्ही. पाटील, ठेकेदार नितीन माने, ग्रामसेवक दत्ता धनगर, संगीता गोटूरे, मार्सा महापुरे, गीतांजली देसाई, छाया हज्जे, सुनीता निकम, सुनीता पाटील, शालन पडळकर, उमा माळी, उमा पोवार, योगिता खोत आदी उपस्थित होते.


‘गांधीनगर’ योजनेमुळे पुढील ३० वर्षे मिळणार मुबलक पाणी- आमदार ऋतुराज पाटील