बातम्या

वातावरणातील बदलामुळे कोल्हापूरकरांचे आरोग्य बिघडले

Due to the change in the environment the health of the people of Kolhapur deteriorated


By nisha patil - 11/30/2023 2:00:13 PM
Share This News:



शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. ऐन थंडीत पावसाची अनुभूती कोल्हापूरकर घेत आहेत. मंगळावरी झालेल्या पावसामुळे बुधवारी कमाल तापमानात एक अंशाची घट होऊन पारा 29.6 अंश सेल्सिअसवर स्थिरावला होता.

कोल्हापूर कारण आता ३ हि हवामानाचा अनुभव येत आहे गेली २ दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल होत आहेत  दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत होता. एकाच वेळी उन, पाऊस आणि थंडी जाणवू लागल्याने साथीचे आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे.  सकाळी ऊन, दुपारनंतर ढगाळवातावरण आणि रात्री थंडी पडत आहे. ढगाळ वातावरण आणि सापेक्ष आर्द्रता 91 टक्क्यांवर गेल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासात 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी (दि. 30) देखील अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याचे वातावरणात संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. अशात वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. कोल्हापुरात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, डोके दुखणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.


वातावरणातील बदलामुळे कोल्हापूरकरांचे आरोग्य बिघडले
Total Views: 2