बातम्या

सुट्टीमुळे पर्यटकांच्या गर्दीने पन्हाळगड फुलला

Due to the holiday Panhalgarh was full of tourists


By nisha patil - 5/17/2024 4:43:27 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी कडक उन्हाळा..मुलांना शाळेत सुट्टी..यामुळे थंड असणाऱ्या पन्हाळा गडावर पर्यटन वाढू लागले आहेत. याचा गडावरील व्यावसायिकांना लाभ झाला असल्याने व्यावसायिक समाधानी असल्याचे तारा न्युज शी बोलताना सांगितले.

वर्षभर लाखो पर्यटक पन्हाळा गडाला भेट देत असतात. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे हिल स्टेशन पन्हाळा पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने फुलत आहे.पर्यटकांच्या गर्दीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे.  भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी कोंदणातील भव्य ऐतिहासिक इमारती, थंड हवेचा आल्हाददायक गारवा, पर्वतराजीचा विहंगम नजारा, तबक आणि नेहरू उद्यानांतील गगनचुंबी सदाहरित वृक्षांवरील शिवतीर्थ उद्यान पन्हाळा नगरपरिषदेने नव्याने चालू केलेल्या शिवतीर्थ उद्यानात मुद्रा प्रतिकृतीत असणारा कारंजा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटासह, कासारी तसेच वारणा खोऱ्यांमधील अमर्याद नेत्रसुखद हिरवाई टिपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पन्हाळा गडाला भेट देत असतात. येथील तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटी बुरूज परिसर, तबक उद्यान, शिवतीर्थ उद्यान पर्यटकांचे आकर्षण नगरपालिकेने नव्याने सुरू केलेले शिवतीर्थ उद्यानसुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, मुद्रा प्रतिकृतीत असणारा रंगीबेरंगी कारंजा, सेल्फी पॉईंट, लहानांसाठी खेळणी, टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या प्रतिकृती, विविध प्रकारची फुले, बदक, मासे, लव्हबर्डस, वृद्धांसाठी निवाऱ्याची सोय असलेले वीस गुंठ्यातील प्रशस्त शिवतीर्थ उद्यान सायंकाळी पर्यटकांची गर्दी खेचत आहे. लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे
जथ्थेच्या जथ्थे पाहावयास मिळत आहेत. भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. यामुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत. या आठ दिवसांत गडावर सुमारे पंचवीस हजार पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली आहे.


सुट्टीमुळे पर्यटकांच्या गर्दीने पन्हाळगड फुलला