बातम्या
संपामुळे अंगणवाडीतील किलबिलाट घरात 'कोंडला'....
By nisha patil - 12/14/2023 3:35:46 PM
Share This News:
अंगणवाडीचा काही दिवस संप सुरु असल्यामुळे संपामुळं लहानग्यांची घरातल्या वातावरणात मन रमत आहे त्यामुळे अंगणवाडीशी गट्टी तोडली आहे. जिल्ह्यात एकूण ८८ हजार तीन ते सहा वयोगटातील बालके अंगणवाडीत जातात. तिथे त्यांना पोषण आहारासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षण मिळते. जिल्ह्यातील ७३२२ अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्याने या बालकांचा दिनक्रमच बिघडला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातच त्यांचा खेळ, खाणे-पिणे, बागडणे सुरू राहते. यामुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक, तर लागलाच शिवाय कुपोषित मुलांना पोषण आहार न मिळाल्याने ते पुन्हा कुपोषितपणाच्या खाईत लोटले जातील का ?, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, गेली दहा दिवस सुरू असलेला अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे आयांनीही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी खासगी अंगणवाड्यांमध्ये मुलांचे नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. परिणामी, शासकीय अंगणवाड्यातील पटसंख्येवर याचा परिणाम होणार आहे.जिल्ह्यात एकूण ७३४९ अंगणवाडी सेविका, मदतनीस कार्यरत आहेत. यापैकी तब्बल ७ हजार ३२२ अंगणवाडी सेविका, मदतनीस संपात सहभागी झालेल्या आहेत. केवळ २७ कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये हजर आहेत, अशी नोंद महिला व बालकल्याण विभागाकडे आहे.
संपामुळे अंगणवाडीतील किलबिलाट घरात 'कोंडला'....
|