सुशांत सिंह राजपूतचा 'डुप्लिकेट'! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही झाले हैराण

Duplicate of Sushant Singh Rajput Fans were also surprised to see the face and looks


By nisha patil - 8/8/2023 6:50:13 PM
Share This News:



सुशांत सिंह राजपूतचा 'डुप्लिकेट'! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही झाले हैराण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  च्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण, सुशांत सिंहचं चाहत्यांच्या मनातील स्थान कायम आहे. सुशांत सिंह राजपूतची रिअल लाईफमधील एक्सिट चाहत्यांच्या मनाला आजही बोचतेय. सुशांत हयात नसल्याचा धक्का चाहत्यांना आजही पचलेला नाही. सुशांतच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. आजही त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या आठवणींना उजाळा देतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूतचा डुप्लिकेट दिसत आहे. हा व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे'
 

सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारख्या सेम-टू-सेम दिसणाऱ्या तरुणाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या तरुणाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते आणि नेटकरी चांगलेच हैराण झालं आहेत. सुशात सिंह राजपूत परत आला का, असा सवाल अनेक चाहत्यांच्या मनाच उपस्थित झाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या व्हायरल तरुणाचं नाव डोमिन अयान आहे. डोमिन अयानचा चेहरा आणि लूक्स अगदी सुशांतसारखे असल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत
वूम्पला या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा डुप्लिकेट डोमिन अयानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, डोमिन अयानचा चेहरा, स्टाईल, उंची अगदी सुशांत सिंह राजपूतसारखी असल्याचं व्हायरल फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, दोन व्यक्ती इतके एकसारखे कसे दिसू शकतात. या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.


सुशांत सिंह राजपूतचा 'डुप्लिकेट'! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही झाले हैराण