बातम्या

दत्ता दळवींना आज जामीन मिळणार...?

Dutta Dalvi will get bail today


By nisha patil - 11/30/2023 1:57:25 PM
Share This News:



माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याबद्दल अपशब्द वापरणं चांगलंच भोवलं आहे. दत्ता दळवी यांना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून  लगेचच त्यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला, मात्र पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे आज तरी पोलीस कोर्टात म्हणणं मांडतात का? आणि त्यानंतर दत्ता दळवी यांना जामीन मिळतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जामीन न मिळाल्यास महामार्ग रोखून धरू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. तसेच, जामीन न मिळाल्यास ईशान्य मुंबईत  शिवसैनिक देखील आक्रमक होतील, असा इशाराही ठाकरे गटानं दिला आहे. 
    दत्ता दळवी यांचे पुत्र योगेश दळवी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांची सकाळी भेट घेतली. त्यामुळे आज तरी दत्ता दळवींना जामीन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दत्ता दळवींना आज जामीन मिळणार...?