शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात ई-कंटेंट कार्यशाळेचा समारोप

E Content Workshop concluded at Shivaji University


By nisha patil - 1/31/2025 12:56:24 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात ई-कंटेंट कार्यशाळेचा समारोप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय 'डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इ- कंटेन्ट फॉर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स' कार्यशाळेचा समारोप झाला. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व्हिडीओ एडिटर अक्षय दळवी होते. त्यांनी ऍडॉब प्रीमियर-प्रो सॉफ्टवेअरवरील प्रात्यक्षिकासह विविध एडिटिंग टूल्सची माहिती दिली. यावेळी क्रोमा स्टुडिओला भेट देऊन तंत्रज्ञ मल्हार जोशी यांनी कॅमेरा, लाईट्स, स्टुडिओचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळेत विविध शिक्षक, विद्यार्थी व विभागप्रमुख उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात ई-कंटेंट कार्यशाळेचा समारोप
Total Views: 62