बातम्या

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "ई- लोकशाही" अभिनव प्रकल्प

E Democracy innovative project conceived by District Collector Amol Yedge


By nisha patil - 9/4/2025 8:44:21 PM
Share This News:



जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "ई-लोकशाही" अभिनव प्रकल्पाची सुरुवात

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिला 'ई-लोकशाही' प्रकल्प कोल्हापुरात सुरू करण्यात आला आहे. 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे लोकशाही दिन अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
 

या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या तक्रारी त्याच दिवशी स्कॅन करून संबंधित विभागाला ऑनलाईन पाठवल्या जातात आणि www.elokshahikop.in या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातात. संबंधित विभागांनी दिलेली उत्तरेही त्यावर प्रसिद्ध केली जातात.ई-लोकशाहीमुळे वेळ, कागदपत्रांचा वापर आणि गैरसमज टळणार असून नागरिकांना त्यांच्या तक्रारींवरील कार्यवाही थेट ऑनलाइन पाहता येणार आहे.
 

2024 ते 2025 या कालावधीत 2,575 अर्जांपैकी 2,182 अर्जांवर कार्यवाही करण्यात आली असून, एप्रिल 2025 पासून ई-लोकशाही कार्यान्वित झाली आहे.हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून "ई- लोकशाही" अभिनव प्रकल्प
Total Views: 49