बातम्या

हसन मुश्रीफांनंतर ईडीचा मोर्चा कोल्हापुरातून सांगलीत

ED march from Kolhapur to Sangli after Hasan Mushrif


By nisha patil - 6/24/2023 4:45:39 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर तीनेवळा ईडीची धाड पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी निगडीत संस्थांकडे ईडीचा मोर्चा वळला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे शिलेदार समजले जातात. कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांच्या साथीने भाजपचा वारू रोखला आहे. दुसरीकडे सांगलीत जयंत पाटील वजन राखून आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रावर भाजपवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कराडमध्ये दोन दिवसांपूर्वी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखानदारीचा मुद्दा उपस्थित करताना मोदींमुळेच कारखाने जिवंत असल्याचे म्हटले होते. पश्चिम महाराष्ट्राचे अर्थकारण साखर कारखानदारीवर आहे. हसन मुश्रीफ यांची चौकशी करताना नफ्यात आणि सुस्थितीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धाड टाकण्यात आली. सांगलीमध्येही जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेत चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेनंतर खात्यांचे निमित्त करून राजारामबापू पाटील बँकेतील खात्यांची चौकशी करण्यात आली आहे.
सांगलीत ईडीकडून एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांकडे एकूण तब्बल 60 अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले. या पाच व्यापाऱ्यांकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्याची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे. यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबत चौकशी केल्याचे समोर आले आहे.


हसन मुश्रीफांनंतर ईडीचा मोर्चा कोल्हापुरातून सांगलीत